गावाविषयी
मित्रांनो आपले गाव आपल्याला नेहमीच प्रिय असते, व आपल्या मनात आपल्या गावाविषयी एक वेगळीच आपुलकी निर्माण झालेली असते. आपण जरी शहरात राहायला गेलो असलो तरी गावाकडील आठवणी नेहमीच आपल्या सोबत असतात. आपल्याला आपल्या गावाची ओढ नेहमीच असते.
आपल्या गावाचे नाव धर्मपुरी हे आहे हे गाव सोलापूर शहरापासून १०० किमी अंतरावर आहे. आपले गाव निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. तेथे राहणारे लोक खूपच दयाळू आणि मन मिळवून स्वभावाचे आहेत. गावातील शांत आणि प्रसन्न वातावरण मला खूप आवडते. त्यामुळे मला गावात राहायला खूप छान वाटते.
आपल्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून सर्व शेतकरी बांधव आपापल्या शेती कामासाठी शेतात जातात. व सर्व आपापली कामे आवडीने करतात. तसेच माझे गाव जास्त मोठे नाही 120 ते 130 एवढे कुटुंब माझ्या गावात राहत आहेत. तसेच माझ्या गावात गणपती दसरा, होळी, रामनवमी, कृष्णजन्माष्टमी असे सार्वजनिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. माझ्या गावातील सर्व बांधव मिळून मिसळून राहतात. व कधीही भांडण तंटा करत नाहीत.कधीही दुसऱ्या कोणाला त्रास देत नाहीत. सर्व गोडी गमतीने व एकजुटीने राहतात.तसेच गावात प्राचीन काळातील मंदिर आहे त्यामुळे राम नवमीला आमच्या गावात यात्रा भरते. यात्रेनिमित्त बाहेरील गावातील खूप मोठ्या प्रमाणावर लोक तेथे दर्शन घेण्यासाठी येतात. रामनवमीला आमच्या गावात भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो.
तसेच आपल्या गावातून नीरा उजवा कालवा वाहतो . कालव्याला बाराही महिने पाणी असते बाराही महिने ही वाहत राहते. त्यामुळे आमच्या गावात पाण्याची कमतरता भासत नाही. व आमच्या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाचे तसेच इतर बागायती पिके घेतात. मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत, तसेच फळभाज्या चे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. आमच्या गावात मोठ्या प्रमाणावर सर्व शेतकरी बांधवांकडे दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे आमच्या गावात दूध, दही, लोणी, तूप इत्यादी पदार्थाची कमतरता भासत नाही.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पादरर्शक, गतिमान व कालवध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरीता महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.